Hon'ble Principal

एकविसावे शतक म्हणजे कौशल्य आणि ज्ञानाचे शतक. ज्याच्याकडे विशिष्ट कौशल्ये आहेत किंवा त्यांच्याकडे योग्य ज्ञान आहे आणि ते कसे लागू करावयाचे हे माहित असलेले व्यवसायिक यशस्वी झाले आहेत.
आयटीआय चे कौशल्य अभ्यासक्रम सर्वांसाठी उत्तम आहेत त्यामुळे करिअर आणि प्लेसमेंटच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. किंबहुना इतर शैक्षणिक अर्हता धारका मधील बेरोजगारीचे वाढत्या प्रमाणाच्या तुलनेत, उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या इतरांच्या तुलनेत योग्य कौशल्य असलेल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची चांगली संधी आहे.
म्हणून पालक, शिक्षक, आजी व माजी विद्यार्थ्यांनो कृपया तुमच्या पाल्याच्या प्रवेशाबाबत, व्यवसायाबाबत, प्लेसमेंटबाबत आमच्या तज्ञ आणि समिती सदस्याचे मार्गदर्शन मोकळेपणाने संपर्क साधून घ्या.
तरी आपल्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.


(एन. ए. कुलकर्णी)
प्राचार्य,
औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
कवठेमहांकाळ जिल्हा : सांगली